Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना अपडेट्स : पिंपरी चिंचवड शहरात ८३५ पॉझिटीव्ह रुग्ण … तर १५ मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. २३ सप्टेंबर २०२० ) रोजी ८७२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ८३५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ५५७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे पिंपळे गुरव ( पुरुष ८४ वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ५१ वर्षे , स्त्री ६९ वर्षे, पुरुष ७० वर्षे ) , देहुरोड ( पुरुष ६४ वर्षे ) , आकुर्डी ( पुरुष ६४ वर्षे , स्त्री २३ वर्षे ) , चिखली ( स्त्री ६५ वर्षे , पुरुष ८१ वर्षे ) , पिंपळे सौदागर ( पुरुष ५४ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ७२ वर्षे ) , वाकड ( पुरुष ४० वर्षे ) , रहाटणी ( पुरुष ७५ वर्षे ) , संत तुकारामनग पिंपरी ( पुरुष ४७ वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ७२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला रुग्ण हे आळंदी ( पुरुष ४३ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

Google Ad

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!