Google Ad
Editor Choice Pune

लोकसभेची उमेदवारी देताना पार्थ पवारांची किंमत कळली न्हवती का?… गिरीश बापट

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्यात किती मॅच्युरिटी आहे हे लोकांना आधीपासूनच माहीत आहे. पार्थ यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची मॅच्युरिटी किती, याची माहिती त्यावेळी नव्हती का ?, असा प्रश्न भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी उपस्थित केला आहे. राजकीय जीवनात अनेकांना आपली मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार हे तर पवार कुटूंबातील आहेत. पार्थ पवारांना या प्रकरणात काहीतरी असत्य आहे, असे वाटत असेल त्यामुळे त्यांनी सत्यमेव जयते हा नारा दिला असावा, असेही बापट यांनी सांगितले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी सुरू होईल. याप्रकरणात कोण आहे, कोण नाही, हे सत्य बाहेर येईल. सुशांतसिंह प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होत नाही. सत्य लोकांसमोर येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल आमच्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे खासदार बापट म्हणाले.

Google Ad

जम्बो कोविड केअर सेंटर २४ऑगस्टला सुरू होईलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणारे जम्बो कोविड केअर सेंटर १९ ऑगस्टला म्हणजेच आज सुरू होणार होते. पण, अजूनही त्याचे काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांनी आज (१९ऑगस्ट) या कोविड केअर सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. याविषयी बोलताना ते म्हणाले, मागील काही काळात पुण्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे या कोविड केअर सेंटरचे काम लांबले. परंतु आता वेगाने काम सुरू असून येत्या २४ ऑगस्टला हे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होईल अशी माहिती प्रशासनाणे दिल्याचे त्यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!