Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : ‘ आम्ही भाडं नाही देऊ शकत … ‘ ; शॉवरला गळफास लावून व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे सगळीकडे भीषण परिस्थिती ओढावली आहे. यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आलं आहे. यातून मुंबईत आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदिवली इथे राहणाऱ्या एका जोडप्याने राहत्या घरातच आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून एक सुसाईड नोटदेखील मिळाली आहे. बुधवारी सकाळी व्यावसायिक जिग्नेश दोशी (वय ४५) आणि त्यांची पत्नी काश्मीरा (वय ४०) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

या जोडप्याला एक १७ वर्षीय मुलगा आहे. मृतदेहाच्या शेजारी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घर भाडं देऊ शकले नसल्याने या जोडप्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगा जेव्हा रात्री ११ च्या सुमारास घरी गेला तेव्हा त्याने आईला मृत अवस्थेत बेडवर पाहिलं. त्यानंतर तो ओरडत वडिलांना आवाज देत दुसऱ्या खोलीत गेला ते कुठेही बाबा दिसले नाहीत.

Google Ad

तितक्यात मुलाच्या लक्षात आलं की, बाथरुमचा दरवाजा हा आतून बंद आहे. त्याने क्षणाचाही विचार न करता दरवाजा तोडला. त्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन हादरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश यांनी बाथरुममधील शॉवरला गळफास घेत आत्महत्या केली. मुलाने तात्काळ घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली आणि यानंतर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जिग्नेश आणि काश्मीरा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!