Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे सौदागर येथील साई चौक ग्रेड सेपरेटरचा प्रश्न मार्गी … ‘शिवार चौक’ ते ‘हिंजवडी’ भुयारी मार्गाचे उदघाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपळे सौदागर येथील शिवार चौक,साई चौक ते हिंजवडी कडे जाणारा ग्रेड सेपरेटरचे ( भुयारी मार्ग ) आज आमदार ‘लक्ष्मण जगताप’ व महापौर ‘उषा ऊर्फ माई ढोरे’ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळणवळण असलेल्या परिसरातील चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

Google Ad

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बी.आर.टी यांच्या मार्फत साई चौक येथे भुयारी मार्गाचे काम आज १००% पूर्ण झालेले असून तो भुयारी मार्ग आज आपल्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे या परिसरामध्ये आयटी कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवासि यांना सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे . तसेच या भुयारीमार्गामुळे हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूकीसाठी सत्तर टक्के मार्ग मोकळा (ट्रॅफिक फ्री) मिळणार आहे . या भुयारीमार्गा मुळे विशाल नगर, वाकड , हिंजवडी जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असुन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागलाआहे.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे, विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, संदीप कस्पटे, नगरसेविका निर्मला कुटे, ममता गायकवाड, आरती चोंधे, जयनाथ काटे, संजय भिसे, विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!