Google Ad
Editor Choice Pune District

Junner : पुणे जिल्ह्यात देवच नाही सुरक्षित … लॉकडाऊनचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरामधील दागिन्यांवर मारला डल्ला!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात लॉकडाऊन असल्याने मंदिरं बंद आहेत आणि याच गोष्टीचा फायदा घेत चोरटे मंदिरामधील दागिन्यांवर डल्ला मारतानाचं उघड होत आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेल्या आणे गावात कालिका माता मंदिरात भरदिवसा चोरी करत चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत. बरोबर महिनाभरापूर्वी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा आणे इथल्या कालिका माता मंदिरात चोरी झाल्याने राज्यातील देव सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीच्या अंगावरचे दागिने आणि मुकुट चोरीला गेला आहे. कालिका देवीचे पुजारी साईनाथ सासवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास आणे इथल्या खालच्या पेठेत असलेल्या कालिका देवीच्या मंदिरात प्रवेश करून देवीचा १ किलो २०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व देवीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.

Google Ad

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व गाभारा अशा दोन्ही दरवाजांना असलेली कुलपं शाबूत असून चोरट्याने गाभाऱ्याला असलेल्या झरोक्यातून आत प्रवेश करून चोरी केल्याचे साईनाथ सासवडे यांनी सांगितले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पोलिसात तक्रार दिली असून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास करत आहेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!