Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार … मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने सध्या सुरू असलेल्या सेवांमध्ये वाढ करून त्या १५८० वरून १६८५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने लोकल धावणार आहेत.लॉकडाऊन लागू होण्याआधी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर नियमितपणे १ हजार ३६७ लोकल चालवण्यात येत होत्या, निर्णयानुसार २९ जानेवारीपासून या सर्व लोकल पूर्ववत धावतील, तब्बल दहा महिन्यांनंतर पश्चिम रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

रेल्वे प्रशानस लोकल पूर्ण क्षमतेने चालवण्यास सज्ज असले तरी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी कधी दिली जाईल याबद्दल अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. या बद्दल लवकरच राज्य सरकार निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!