Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा म्हणाले … भाजपा शब्दाचा पक्का, नितीशकुमारच मुख्यमंत्री!

महाराष्ट्र 14 न्यूज : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. कोणी कितीही जागा जिंको, मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील, असे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. भाजपा आपल्या शब्दाचा पक्का आहे. बिहारमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी नितीशकुमार हेच आमचे मुख्यमंत्री असतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी केले.

Google Ad

बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, बिहार आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री जदयूचा होणार आणि ते नितीशकुमारच असतील, हे आधीच ठरल होत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला. महाराष्ट्रात प्रचार करताना पंतप्रधान मोदींनी भाजपाचाच मु‘यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती. शिवसेनेलाही ही भूमिका मान्य होती, पण निकाल जाहीर झाल्यानंतर या पक्षाने धोका दिला. बिहारमध्ये मोदींनी सुरुवातीलाच नितीशकुमार हेच आमचे नेते असतील, असे जाहीर केले होते. आता भाजपाला जदयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून आम्ही सौदेबाजी करायची का, शिवसेनेत आणि आमच्यात बराच फरक आहे. आम्ही शब्दांचे पक्के आहोत. बिहारमध्ये भाजपा नितीशकुमार यांच्या नेतृत्वात काम करेल, असे ते म्हणाले.

भाजपाचा प्रभारी म्हणून, मला बिहार निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदार मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटप आणि प्रचारापर्यंत सहभागी होता. प्रत्येक राज्यातील निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरुक आहे. एक वेगळ्या प्रकाराचे राजकारण पाहायला मिळते, असे त्यांनी सांगितले.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

44 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!