Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : पुणे पदवीधर मधून भाजपचे संग्राम देशमुख यांनी भरला अर्ज … पदवीधरांच्या प्रश्नासाठी भाजपाचे उमेदवार एकजुटीने काम करतील

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे पदवीधरची जागा केवळ एक अपवाद वगळता परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाची राहिली आहे . गेल्या 12 वर्षात पदवीधरांच्या विषयात बरेच काही केले . आगामी काळातही पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार काम करतील , अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ . चंद्रकांत पाटील यांनी दिली . पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे संग्राम देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .

यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी खासदार गिरीश बापट , भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक , महापौर मुरलीधर मोहोळ , आमदार भीमराव तापकीर , मुक्ता टिळक , रणजित पाटील , सिद्धार्थ शिरोळे , लक्ष्मण जगताप , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , शहर संघटन मंत्री राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Google Ad

चंद्रकांत पाटील म्हणाले की , पुणे पदवीधरची जागा परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाचीच राहिली आहे . गेली 12 वर्षे मी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले . या काळात पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले . यात प्रामुख्याने यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी राज्य स्तरावर मार्गदर्शन केंद्र सुरू करावेत , यासाठी पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावला . मी स्वत : कोल्हापूरमध्ये विद्याप्रबोधिनी नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले . त्याचबरोबर पदवीधर मतदार याद्यांचा जो घोळ सातत्याने व्हायचा , त्यासाठी दिल्लीत जाऊन या विषयाची सोडवणूक केली .

ते पुढे म्हणाले की , संग्राम देशमुख यांच्यासह भाजपाचे तीन पदवीधर उमेदवार आणि अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार हे सर्वजण शिक्षकांच्या आणि पदवीधरांचे प्रश्न मांडतील . तसेच आगामी काळात आरक्षणातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे . महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार भत्ता सुरू करणे , अंतरवासिता कायदा ( अॅप्रन्टिसशीप अॅक्ट ) मध्ये सुधारणा करून घेणं आदी विषयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार सर्वांना सोबत घेऊन काम करतील .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!