Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : दसऱ्यापासून राज्यभरात जिम , व्यायामशाळा सुरू होणार … मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात मिशन बीगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू होत आहेत. याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपयांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) केली आहे. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत.

त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीचे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

Google Ad

या चर्चेत ते बोलत होते. जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी एओपीचे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार एसओपीतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णाशय्या रिकामे राहू लागले आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत.

त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जिम, व्यायामशाळांसाठी एसओपी तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या एसओपीचे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकावर आहे. याचे काटेकोर पालन न केल्यास गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!