Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … नगरसेविका ‘चंदाताई लोखंडे’ यांच्या मार्गदर्शनाखाली अँटीबॉडी सिरो सर्व्हे !

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविड-१९ चा प्रकोपापेक्षाही सोशल माध्यमाव्दारे कोरोनाबाबत पसरविली जाणारी भीती अधिक तीव्र असल्याने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत धावाधाव सुरु आहे. कोरोना आजाराची ही भीती कमी व्हावी व आजचे खरे वास्तव समोर यावे याकरिता काही ठराविक नागरिकांची अँटीबॉडी तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक अँटीबॉडी सिरो सर्वेनुसार कोरोनाची घातकता लक्षात येते.

पिंपरी चिंचवड शहरामधील SARS COV-2 IgG अँटीबॉडीच्या या सिरो सर्व्हे अनेक भागात करण्यात आला. पिंपळे गुरवमधील गुलमोहर कॉलनी, प्रभात नगर, सुदर्शन नगर या भागात ‘नगरसेविका चंदाताई लोखंडे’ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे करण्यात आला. प्रत्येक वेगवेगळ्या भागातून २५ रक्त नमुने संकलित करून डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Google Ad

प्रत्येकाची रक्त नमुण्यासह कोविड चाचणी आणि लक्षणे या संबंधित माहिती गोळा केली जाईल व त्यानुसार रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांवर औषधोपचार केले जातील. या उपक्रमा वेळी या भागातील स्थानिक नगरसेविका महिला बालकल्याण समितीच्या सदस्या चंदाताई लोखंडे, माजी नगरसेवक राजु लोखंडे व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल चे डॉक्टर्स व स्टाफ यावेळी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

52 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!