Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

रेकॉर्डवरील गुन्हेगाराने स्वतःचे नावाने बनविले पुणे पोलीसांचे नावाचे बनावट ओळखपत्र … गुन्हे शाखेने केले जेरबंद

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहर पोलीस दलाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार ईम्तीयाज इद्रीस मेमन , रा . हडपसर , पुणे हा पुणे पोलीसाचे स्वतःचे नावाने बनावट ओळखपत्र तयार करुन तो त्याचा स्वतःच्या फायद्याकरीता वापरत होता , त्याची एक छायांकित प्रत बच्चन सिंह , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर यांना प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी युनिट -५ , गुन्हे शाखा यांचेकडे पाठविण्यात आली .

त्यावरुन मेमन याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले . मेमन याने पुणे पोलीसाचे सन २००७ मधील ओळखपत्र त्यावर स्वतःचे नाव , स्वतःचा फोटा लावुन व त्यावर स्वतःची खरी जन्मतारिख टाकुन तो राजरोजपणे त्याचा वापरत करीत होता . पोलीसांना मिळालेल्या बातमीवरुन त्यास युनिट -५ , गुन्हे शाखेने पकडले , त्यावेळी इम्तियाज मेमन हा उडवाउडवीचे उत्तरे देत होता .

Google Ad

त्याचे पुर्वीचे रेकॉर्ड पाहता , हडपसर वानवडी पोलीस ठाणे , येथे , दंगल , जाळपोळ , खंडणी अशाप्रकारे पाच गुन्हे दाखल आहे . मेमन हा गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो स्वतःच्या फायद्याकरीता पुणे पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र सन २००७ पासुन त्याचा वापरत करीत असल्याने त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे .

तसेच नागरिकांना आव्हान करण्यात येते की , जर कोणी इसम पोलीसांचे बनावट ओळखपत्रचा वापर करीत असल्याचा संशय आल्यास आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी , संबधीत पोलीस ठाणेचे अधिकारी , पोलीस नियंत्रण कक्ष , पुणे शहर यांचेशी तात्काळ संपर्क साधावा , त्याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , बच्चन सिंह , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , लक्ष्मण बोराटे , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे २ , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -५ चे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक भास्कर जाधव , स.पो.निरी . संतोष तासगांवकर , पो.उप.नि.शेंडगे , पोलीस स्टाफ प्रदीप सर्वे , भरत रणसिंग , अहमज पठाण , दया शेगर , अंकुश जोगदंडे , संजयकुमार दळवी यांनी ही कामगिरी केलेली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!