Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : मराठा आरक्षणासंदर्भात दिशा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यावर ठरणार …

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा आरक्षणासंदर्भात पुढे काय करायचे याची दिशा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमधून मुंबईत आल्यानंतरच ठरवली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारला गेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ तारखेला ते मुंबईत येतील. त्यानंतर फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाणांनी सांगितले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!