Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : सावधान – महाराष्ट्राबाहेर जाताय ? या ‘ अकरा ‘ राज्यात नो एन्ट्री … कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रातून इतर राज्यात नातेवाईकांकडे किंवा काही कामनिमित्त जात असाल तर जपून. तुमच्याकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर तुम्हाला दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे देशातील 9 राज्ये दोन केंद्रशासित प्रदेश मिळून अकरा राज्यात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असाल तर तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्या आणि रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर गरज असेल तरच प्रवास करा.

मध्यप्रदेशात जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करण्यात आली आहे.रिपोर्ट नसेल तर मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्रात विशेषत: नागपूरमध्ये रुग्णवाढ अधिक झाल्याने मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असेलेल्या मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात व्यावसायिक कामानिमित्त दोन्ही राज्यातील नागरिकांच मोठ्या प्रमाणात ये-जा असते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!