Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शनिवारी होणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा … प्रधानमंत्री आवास योजना- संगणकीय घरकुल सोडत आणि विविध विकास कामांचे ई- भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या च – होली , रावेत व बो – हाडेवाडी येथील नियोजित प्रकल्पातील सदनिकांची संगणकीय सोडत तसेच प्रभाग क्र . १० पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा, प्रभाग क्र . १० मधीलबर्ड व्हॅली उद्यानामधीलम्युझिक फाऊंटन व लेझर शो कामाचे भूमिपूजन

Google Ad

प्रभाग क्र . २१ व २८ मध्ये पिंपळे सौदागर – पिंपरी या दरम्यान महापालिकेतर्फे नदीवर समांतर पुल बांधणे या कामाचे भूमिपूजन समारंभ, प्रभाग क्र . २४ मधील वाकड रोड रत्नदीप कॉलनी ते भिंगारे कॉर्नर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण या कामाचा ई भूमिपूजन समारंभ आणि लोकार्पण सोहळा शनिवार , दि .२७ फेब्रुवारी २०२१ रोजी स . ११.०० वा . पासून प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह विंचवड येथे मा. प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री , पर्यावरण , वन आणि हवामान बदल , माहिती व प्रसारण , अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम,भारत सरकार, यांच्या शुभहस्ते तसेच मा. अजित पवार उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री , पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा उर्फ माई मनोहर ढोरे मा.महापौर पिंपरी चिंचवड असणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खासदार श्रीम . सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, खासदार डॉ . अमोल कोल्हे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, उपमहापौर केशव घोळवे, संतोष ( आण्णा ) लोंढे सभापती स्थायी समिती, नामदेव ढाके सत्तारूढ पक्षनेता, शरद उर्फ राजू मिसाळ विरोधी पक्षनेता, आयुक्त राजेश पाटील महानगरपालिकेचे सर्व समित्यांचे सभापती, प्रभाग अध्यक्ष, सर्व नगरसदस्य, प्रमुख पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!