Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : खबरदार … फटाक्यांवर कोरोना संकट … यंदा फटाके फोडाल तर पोलीस कारवाई होणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

Google Ad

ठाकरेंनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणार नसल्याचं सांगितलं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकत्र येऊन फटाके वाजवल्यास अधिक धोका वाढू शकतो. तसंच प्रदूषण वाढल्यास देखील कोरोना संसर्ग अजून पसरू शकतो, असं उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं होतं.

आता याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आज नियमावली जाहीर केली आहे. दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास बंदी घातली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलबाजा, अनार फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जाणून घ्या नियमावली-

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो. त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची संभाव्यता असते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.

हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. त्या स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.

वरील दोन्ही बाबत नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका आणि पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके फोडता येतील. फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.

सोलंकी ज्वेलर्स … ‘नाते शुद्धतेशी’ सोने • चांदी . डायमंड • प्लॅटीनम • राशी रत्ने .. दिघी रोड, जुनी सांगवी , मेन रोड

‘कोविड’च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली आपल्याजवळ बाळगू नये.

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हात स्वच्छ करताना सॅनिटायजरऐवजी साबण आणि पाण्याने हात नियमितपणे धुण्यास प्राधान्य द्यावे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी लहान मुले फुलझडी अगर अनार फटाके फोडणार असल्यास ती पालकांच्या / मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे बंधनकारक आहे. तसेच अशावेळी पाण्याने भरलेली मोठी बादली, साबण आणि सुती रुमाल अगर पंचा सोबत असावा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!