Google Ad
Editor Choice india

Bihar : बिहार निवडणुकीत सेनेची ‘ तुतारी ‘ वाजलीच नाही … भोपळाही फोडला नाही!

महाराष्ट्र 14 न्यूज : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पहिले कल हाती आले असून एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही मोठा गाजावाजा करत या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. पण, अजूनही कुठे ‘तुतारी’  वाजली नाही. सेनेनं अजूनही भोपळा फोडलेला नाही.

Google Ad

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बिहार सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगला होता. याच दरम्यान, शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.  निवडणूक आयोगाने सेनेला बिस्कीट हे चिन्ह सुद्धा दिले होते. पण, निवडणूक आयोगाने ‘बिस्कीट’ चिन्ह दिल्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं आयोगाकडे चिन्ह बदलून द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत   ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिले होते.

शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता. ‘शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होता.

आमची मते शिवसेनेला जातात असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य ठरवत शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणा ऐवजी दुसरे चिन्ह दिले.
पण, आज मतमोजणीत शिवसेनेची तुतारी मात्र, कुठेही वाजली नाही. शिवसेनेनं एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. त्यामुळे सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचे चिन्ह आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!