Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad political party

राष्ट्रवादीच्या विरोधीपक्षनेते पदासाठी पिंपरी चिंचवड मध्ये पाचजण इच्छुक … अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराचा आढावा आणि नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्रीअजितपवार पिंपरी चिंचवड मध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेता पदासाठी इच्छुकांना आपले नाव पक्षाकडे देण्यास सांगितले होते. राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा पक्षाचा निर्णय आहे.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी स्थायी समिती माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.

Google Ad

दरम्यान अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावेळी आले असता इच्छुकांची पत्रे मला मिळाली आहेत. त्यामुळे शहर अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घ्यावी आणि इच्छुकांची नावे मला पाठवावीत, असा आदेश शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना दिला होता. त्यामुळे अजित पवार या पाचपैकी कोणाला विरोधी पक्षनेतेपद देतात, हे लवकरच कळेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!