Google Ad
Editor Choice

आमदार ‘जगताप लक्ष्मण पांडुरंग’ यांच्या स्थानिक विकासनिधीतून … गणेश नगर एम के चौक परिसरात ओपन जिमचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ सप्टेंबर) : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून व आमदार निधीतून नवी सागंवी-पिंपळे गुरव गणेश नगर येथील एम के चौक परिसरात ओपन जिमचे साहीत्य बसीवन्यात आले. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत जेष्ठ नागरिकांच्या करीता विरंगुळा कट्टा बनविण्यात आला. तो ही नागरिकांच्या करीता खुला करण्यात आला.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप यांच्या संकल्पनेतून व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निधीतून या ठिकाणी बसविण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले, आणि ही जिम सर्व नागरिकांकरीता खुली करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे , प्रभाग अध्यक्ष सखाराम रेडेकर , सामाजिक कार्यकर्ते अशोक कवडे, शशिकांत नागणे , आप्पा पाटील , प्रविण जगताप, अरुण गळतगे , निकम , गडदरे , संगणे , एम पी चौगुले आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Google Ad

सार्वजनिक विकासकामांचा फायदा हा मर्यादित नागरिकांना होत नसून तो सर्व नागरिकांना होत असतो. त्यामुळे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देताना आमदार लक्ष्मण जगताप यांनी कधीही दुजाभाव केला नाही.सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदार संघात निधी आणण्यात ते नेहमीच अग्रभागी असतात. आपल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

जिमच्या फी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्यामुळे या ओपन जिमचा नागरिकांना फायदा होणार आहे, मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या ओपन जीमचा लाभ घेतील. एखाद्या नायकासारखी आपलीही शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जीम’चा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे. याच गोष्टीचा विचार करून आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या मतदार संघात सहकारी सोसायटीच्या आवारात आणि सार्वजनिक ठिकाणी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून जिम साहित्य बसवण्यात आले आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement