Google Ad
Editor Choice

अखेर ठरलं ! रविवार नंतर पुन्हा दिसणार नाही चांदणी चौकातील हा पूल

महाराष्ट्र154 न्यूज, (दि.२७ सप्टेंबर) : वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर पाडला जाणार आहे. .येत्या 2 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता हा पूल पाडला जाणार आहे. चांदणी चौकातील पुल पाडण्यासंदर्भात आज बैठक झाली. त्यात निर्णय झाला अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पूल पाडण्याच्या कामाच्या पूर्व तयारी करण्यात आली आहे. याआधी १५ सप्टेंबर रोजी पूल पाडला जाईल असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, पाऊस पडल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पूल पाडण्यात येणार असल्याने या परिसरातील काही इमारती निर्मनुष्य केल्या जाणार आहे. पूल पाडण्यात येणार असल्याने १ ऑक्टोबर २०२२ रात्री ११ ते २ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी एडिफिस या कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Google Ad

दिवाळीपर्यंत दोन्ही बाजूला सेवा रस्ते पूर्ण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत या महामार्गावरील वाहतूक सुलभ आणि सुरळीत होईल. आणि येथे सध्या होत असलेली कोंडी पूर्णपणे संपुष्टात येईल. त्यानंतर नवीन सहा पदरी पूल पुढील सहा महिन्यात बांधण्यात येणार आहे. तो बांधल्यानंतर महामार्गावरून फक्त थेट वाहतूक जाईल तर सेवा रस्त्यावरून पुणे येथील शहरांतर्गत वाहतूक मार्गस्थ होईल. असे राजेश देशमुख म्हणाले.
चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी स्फोटांचा वापर केला जाणार आहे. यासाठी 4 विभांगांचे असतील. ज्यात ब्लास्ट डिझायनर, इंजिनियर आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. २.३० वाजता राडारोडा तिथून काढण्याचे काम सुरू होईल. २ तारखेच्या सकाळी ८ नंतर रोड सुरू करण्यात येईल.

त्यादिवशी हे रस्ते असणार बंद / पर्यायी मार्ग
पूल पाडण्याच्या आदल्या दिवशी रात्री ११ ते ८ दरम्यान जड वाहने मुंबईकडून येणारी तळेगाव कडे थांबवण्यात येणार आहे. तसेच साताराकडून येणारी जड वाहने शिवापूर येथे थांबवली जाणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या हलक्या वाहनांना सोमाटणे फाटा हा रस्ता उपलब्ध असेल. त्याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे वाकड वरुनही वाहनांना पुण्यात प्रवेश करता येणार आहे. तर, तिसरा मार्ग बाणेर दर्शना हॉटेल असणार आहे. साताऱ्याकडून मुंबईला येणारी वाहतूक हलक्या वाहनांना कात्रज जुन्या बोगद्यातून स्वारगेटवरुन मार्ग असेल. याशिवाय वाहनचालक नवले पुल, वडगाव ब्रीज, राजाराम पुल, लॉ कॉलेज रोड, औंध रोड असा मार्ग देखील वापरू शकणार आहेत. याशिवाय वारजे वरुन लॉ कॉलेज रोड, औंध रोड हा देखील मार्ग प्रवासी वापरू शकतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!