Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad Pune

‘भाड्याने देणे आहे’ … औद्योगिक नगरी असलेले पिंपरी चिंचवड आणि शिक्षणाचे माहेरघर पुण्यात, कोरोनामुळे गल्लोगल्ली झळकताहेत बोर्ड …!

महाराष्ट्र 14 न्यूज : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आणि औद्योगिक नगरी असलेले पिंपरी चिंचवड म्हणून या दोन्ही शहरांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. पुणे शहरात शिक्षणासाठी राज्यभरातून विद्यार्थी दाखल होत असत . मात्र सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळा , महाविद्यालये बंद आहेत . ई – लर्निंग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे . पुणे शहर मात्र सध्या रिकामे झालेले आहे . विद्यार्थी , विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उभी राहिलेली वसतीगृहे , भाड्याने दिल्या जाणाऱ्या खोल्या , शिकवणीचे हॉल आणि शहरातील दुकाने मोठ्या संख्येने रिकामी झालेली असून सर्वत्र भाड्याने देणे आहे असे फलक लावलेले दिसून येत आहेत .

आय टी हब आणि शिक्षणाच्या सर्व सुविधामुळे शिक्षणासाठी येण्याचे राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि नोकरीसाठी येणाऱ्याचे प्रमाण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढलेले होते . शहरातील गल्ली बोळात खानावळी , वसतीगृहे , हॉटेल , विविध खाद्य पदार्थांची दुकाने , भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्यांमुळे अनेकांना सुगीचे दिवस आलेले होते . सध्या कोरोनामुळे शाळा , महाविद्यालये बंद आहेत . हे वर्ष असेच जाणार असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे . सर्व व्यवहास सुरुळीत होण्यास सुरुवात होणार असली तरी पालकांची आपल्या मुलांना शाळा , महाविद्यालयांमध्ये पाठवण्याची तयारी नाही .

Google Ad

प्रत्यक्ष शाळा , महाविद्यालयांमध्ये जाऊनच शिकले पाहिजे असे काही नाही या मानसिकतेमध्ये पालक आणि विद्यार्थी दोघेही आलेले आहेत . शासनाच्यावतीने सर्व वर्गांसाठी ई – लर्निंगची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे . त्याचा खूपच लाभ होत असल्याचे पालक आणि विद्यार्थीही सांगत आहेत . व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना एकदा समजले नाही तर पुन्हा पुन्हा ते पाहण्याची व ऐकण्याची सुविधा असल्याने ही शिक्षण पध्दती आता सर्वांना चांगली वाटत आहे .

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकाने , खोल्या , शिकवणीसाठी तयार केलेले हॉल रिकामे झालेले आहेत . सध्या सर्वत्र भाड्याने देणे आहे असे फलक लावलेले आहेत . कोरोनामुळे या सगळ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला आहे . छोट्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करणेही अवघड झालेले आहे . दुकानाचे भाडेही देण्याची क्षमता अनेकांमध्ये राहिलेली नाही त्यामुळे त्यांनी आपला व्यवसायच बंद करून टाकलेला आहे . अनेकांनी आपली दुकाने बंद करून सर्व साहित्य आपल्या घरी नेलेले आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!