महाराष्ट्र 14 न्यूज : तळेगाव दाभाडे येथे निरंकारी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे रविवार. ३० ऑगस्ट २०२० रोजी संत निरंकारी सत्संग भवन, तळेगांव येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी मार्फत ६२ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन श्री.रविंद्र भेगडे (भाजपा अध्यक्ष मावळ )यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार अशा प्रकारचे रक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यात श्री. ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत. कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच प्रकारचे रक्तदान शिबीर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
53 Comments