Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीत रस्त्यावर उभ्या असलेल्या ६ जणांना भरधाव टँकरने उडवले, सांगवीत भीषण अपघात!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मधील जुनी सांगवी परिसरात एका भरधाव पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने रविवारी ( ३० ऑगस्ट )रात्री ९.३० वाजता सहा जणांना उडवल्याची घटना घडली आहे . यात , दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत , अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली . अपघातानंतर टँकर चालक पसार झाला असून सांगवी पोलिसांकडून चालकाचा शोध सुरु आहे .

जवळच असणाररे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले होते, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , डिझेल टँकर ( एमएच 14 एचयू 6872 ) हा सांगवी फाटा येथून विष्णूपंत निवृत्ति ढोरे चौक जुनी सांगवीच्या दिशेने भरधाव जात होता, सदर चौकातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरुन चालत जात असलेल्या सहा व्यक्तींना धडक दिली,यात पाच पुरुष,तर एका महिलेचा समावेश आहे. त्यानंतर टँकर सी सी कॅमेरा असलेल्या एका इलेक्ट्रिक खांबाला जावून धडकला .

Google Ad

या अपघातातील सहा जखमींपैकी चौघांची ओळख पटली आहे . यात महिला आणि एका पुरुषाची प्रकृती गंभीर असून इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत . या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . याप्रकरणी राधेश्याम बब्रुवान मुळे ( वय २६, रा . आनंदनगर , जुनी सांगवी ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अपघातानंतर टँकर चालक पसार झाला . पोलीस त्याचा शोध घेत आहेत . अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली .

सांगवीतील अपघात झाला त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम अगदी संथ गतीने चालू असून, अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळ्यात रस्ता घसरडा झाल्याने सदर चौकात दररोज दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे, रस्त्याच्या कडेने झाडांच्याफांद्या मुळे रात्रीच्यावेळेस अंधार पडतो, रस्त्याच्या कडेलाच अनेकजण आपल्या हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होतो, आणि यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होतात, स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करूनही या हातगाड्यावर कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. आतातरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!