Google Ad
Education Maharashtra

२.३ कोटी विद्यार्थी – शिक्षकांना लाभ , गुगल क्लासरुमचं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य … आज झाले उदघाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकार आणि गुगलच्या या भागीदारीमुळे राज्यातील जवळपास 2.3 कोटी विद्यार्थ्यी-शिक्षकांना याचा उपयोग होणार आहे. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचं पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगलसोबत भागीदारी केली आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,

Google Ad

“महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकताना विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!