Google Ad
Editor Choice Maharashtra political party

खासदार म्हणाल्या ‘माझ्या संपर्कात आलेल्यांची आपापली टेस्ट करून घ्यावी’ … अमरावतीच्या खासदारांना कोरोनाची लागण!

महाराष्ट्र 14 न्यूज : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली.

खासदार नवनीत राणा यांनी आपल्या फेसबूकवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा, शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!