Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Lonawala : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांची धडक होऊन भीषण अपघात … ५ जणांचा मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३६ जवळ हॉटेल फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत.हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात झाला आहे. चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे.

Google Ad

वैभव झुंजारे हे त्यांच्या खासगी कारने ते नवी मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यात त्यांची आई, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे.झुंजारे हे सोलापूर येथील गावी कुटुंबाला घेऊन येण्यासाठी गेले होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते.

अपघातातील मृतांची नावे…
१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
यांचा समावेश आहे.

या अपघातात जमखी झालेल्यांची नावे…
१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)
२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)
३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)
४) किशन चौधरी, (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी) हे जखमी झाले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!