Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : राज्याच्या आरोग्य विभागात मोठी भरती … ८५०० पदं भरणार, राजेश टोपेंकडून परीक्षेची तारीख जाहीर …पहा, कोणती आहेत पद!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी ८ हजार ५०० पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागील महिन्यात उस्मानाबाद येथे दिली होती.

आज आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. २८ फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात ५० टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी औरंगाबादेत केली आहे. आरोग्य विभागात एकूण १७ हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहे. तर साडे आठ हजारांपैकी सुरुवातीला ५ हजार जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Google Ad

सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स -रे टेक्निशियन.

ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर , रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ इत्यादी पदांसाठी ही भरती होणार.

कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले होते. बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!