Google Ad
Editor Choice Pune District

Khed : खेड तालुक्यातील भामाआसखेड धरण परीसरातील कुंरकुंडी गावचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना आसाम बार्डरवर वीरमरण!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाचा धोका असताना भारतीय जवान सीमेवर शत्रूशी मुकाबला करीत आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भामाआसखेड धरण परिसरातील कुरकुंडी गावात एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय-२८) असं या शहीद जवानाचं नाव आहे.

अरुणाचल प्रदेशात तब्येत खालावल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आनंद साजरा केला जात असताना शेजारील पाकिस्तानकडून कुरापती सुरूच होत्या. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मात्र असं असतानाही भारतीय सैन्याचे पुरेपुरे प्रतिकार केला व शत्रूला परतून लावलं. यातच संभाजी ज्ञानेश्वर राळे या जवानाला अरुणाचल प्रदेशात वीरमरण आलं.

Google Ad

संभाजी राळे यांच्या पश्चात आई-वडिल, दोन विवाहित व एक अविवाहित बहिण आहे. जवान संभाजी यांचे पार्थिव उद्या ८जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता पुणे लोहगाव विमानतळावर आणले जाणार आहे. तेथून पार्थिव त्यांच्या कुरकुंडी या मुळगावी नेले जाईल. त्यानंतर सकाळी १९ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जवान संभाजी हे राळे कुटुंबातील एकलुता एक मुलगा होते. त्यांच्या वीरमरणाच्या बातमीने राळे कुटुंबासह संपूर्ण कुरकुंडी गावावर शोककळा पसरली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

61 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!