Google Ad
Editor Choice india

Delhi : लवकरात लवकर भरा ITR अन्यथा द्यावा लागेल दुप्पट दंड … तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक!

महाराष्ट्र 14 न्यूज : असेसमेंट इयर 2020-21 साठी आतापर्यंत 5.16 कोटी रिटर्न फाइल झाले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक आहेत, लवकरात लवकर ITR भरण्याचे काम पूर्ण करा. 10 जानेवारी 2021 पर्यंत आयटीआर फाइल करण्याची तारीख आहे. यानंतर आयटीआर फाइल करण्यास गेल्यास तुम्हाला दुप्पट दंड द्यावा लागू शकतो. कोरोना पँडेमिकमुळे करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची तारीख 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्यावर्षी आयटी रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2019 होती.

आयकर विभागाने आतापर्यंत फाइल करण्यात आलेल्या ITR बाबत ट्वीट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आतापर्यंत AY 2020-21 साठी 5.16 कोटीपेक्षा अधिक जणांनी आयटी रिटर्न 6 जानेवारी 2021 पर्यंत दाखल केला आहे. तुम्ही केला नसेल तर कृपया तुमचा ITR AY 2020-21 आजच दाखल करा.

Google Ad

जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला विभागाकडून दंड आकारला जातो. जर करदात्यांनी 10 जानेवारी 2021 नंतर आयटीआर फाइल केला तर त्यांना 10,000 रुपये लेट फी द्यावी लागेल. शिवाय ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नाही त्यांना लेट फी च्या स्वरुपात 1000 रुपये द्यावे लागतात.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!