Google Ad
Editor Choice india

Keral : एअर इंडियांचं विमान लँडिंगदरम्यान १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १२३ प्रवासी जखमी झाले आहेत तर १५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रनवेहून पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

फायर टेंडर आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास ही घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात १९१ प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये १० मुलांचा समावेश आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!