Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

जिगरबाज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी संजय पालवे यांनी दोन वेळा प्लाझ्मा दान करून चार जणांना दिले जीवदान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका विद्युत विभागात कार्यरत असलेले संजय पालवे हे काॅम्पयुटर आॅपरेटर या पदावर कार्यरत असून, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोना विषयक कामकाजामध्ये पालवे कार्यरत झाले.

पालवे हे मनपातील आदर्श व प्रामाणिकपणे काम करणारं एक सच्चा कर्मचारी असल्याने त्यांची प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कामकाजासाठी आवर्जून ड्यूटी लागतेच. तसेच ते आपल्या पदाला पूर्णपणे न्याय देऊन काम करत असतात. कोविड काळात सलग काम करून, जास्तीत जास्त काळजी घेऊनही अनाहूतपणे ते कोरोना संक्रमित झाले. तसेच त्यांच्या संपर्कामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील कोरोना संक्रमित झालं. त्यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर ते पुन्हा सेवेत नव्या जोमाने रूजू झाले.

Google Ad

पहिल्यांदा जेव्हा त्यांना एका रुग्णास प्लाझ्माची आवश्यकता असल्याचं कळताच त्यांनी स्वतःहून पुढे येऊन प्लाझ्मा दान केला. याप्रकारे त्यांनी त्यावेळी प्लाझ्मा दान करून दोन रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यानंतर त्यांना कळालं की एक व्यक्ती १५ दिवसांच्या अंतराने ब-याच वेळेस प्लाझ्मा दान करू शकतो. मग त्यांना काल (दि.१८ एप्रिल) एका रुग्णास तातडीने प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे कळाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब सदर हाॅस्पिटलला जाऊन दुस-यांदा प्लाझ्मा दान केला. त्यानंतर आपणांस काहीही त्रास झाला नसून, जीवन दान दिल्याने आनंद झाल्याचे पालवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अशाप्रकारे पालवे यांनी एकूण ४ जणांचा जीव वाचवला आहे. सद्य परिस्थिती शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांमुळे शहरात प्लाझ्माचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे, कोरोनातून बरे झालेले लोकही प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत नसून मनपातील संजय पालवेंनी दुस-यांदा प्लाझ्मा दान करून समाजासमोर एक प्रकारे मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या समजकार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या प्रमाणे इतरांनीही स्वतःहून पुढे येऊन प्लाझ्मा दान करून प्राण वाचवण्यासाठी मदत करण्याची आज खरी गरज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!