Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये ‘झुंज दिव्यांग’ संस्थेचा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न … समाजातील दानशुरांनी दिला मदतीचा हात!

महाराष्ट्र 14 न्यूज : झुंज दिव्यांग संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अंतरजातीय सामुदायिक विवाह सोहळा दिनांक ७ मार्च रोजी कोरोना नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आला होता . या सोहळ्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये पाच दिव्यांग बांधवांचा विवाह करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे पिंपरी चिंचवड महापौर, संभाजी ऐवले समाज विकास अधिकारी, यश दत्ताकाका साने, योगिता नागरगोजे नगरसेविका उपस्थित होते. तसेच या विवाह सोहळ्यास व सर्व कार्यक्रमाला मदत करणारे मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके त्यांनी पाच कपाटे, महेश दादा लांडगे भोसरी विधानसभा आमदार यांनी पाच बेड व रमणलाल बाफना यांनी अन्नदानाचे कार्य केले.

Google Ad

या विवाह सोहळ्यात देणगीदार टाटा मोटर्स ग्रुप, रघुनाथ येमुल गुरुजी, ताराचंद, ताम्हणे भाईकाका या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे महिला अध्यक्ष नूतनताई रोमाहरे, दत्तात्रय काळे, दादासाहेब काशीद , कार्यक्रमाचे सहकारी अशोक मगर ,सतीश बोत्रे, अमोल मोरे, विष्णू भोसले, गणेश रोहमारे, संतोष राजवाडे, बाळासाहेब सपकाळ या सर्वांनी कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. झुंज संस्था दिव्यांग बांधवांसाठी सर्व क्षेत्रात लढा देत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर ढोरे यांनी केले.

झुंज संस्था ही दिव्यांग बांधवांना सर्व क्षेत्रात सक्षम बनवून त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे कार्य करणार आहे असे मत संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे यांनी व्यक्त केले तसेच स्र देणगीदारांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दिवटे व देशमुख सर तसेच कार्यक्रमाचे आभार झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांनी यांनी मानले.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!