Google Ad
Editor Choice india

Delhi : या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा फायदा … तपासा तुमचं नाव, या यादीत आहे का ?

महाराष्ट्र 14 न्यूज : पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. दरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीच्या वेबसाइटनुसार कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कुणाला यातून वगळ्यात येणार हे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीएम शेतकरी सन्मान निधीचा फायदा त्यांना घेता येईल ज्यांच्या नावावर शेत असेल. अर्थात पूर्वीप्रमाणे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जोपर्यंत शेत तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. याशिवाय सरकारने या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या काही शेतकऱ्यांची यादी देखील नमुद केली आहे. विशेषत: गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा अशी सरकारची योजना आहे.

Google Ad

कोण आहेत अपात्र शेतकरी?
-संस्थात्मक शेतकरी
-असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
– घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
-केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)

केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.
-मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत.
-तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
-नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.

31 मार्चपूर्वी करा रजिस्ट्रेशन
जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल पण अद्याप नोंदणी केली नसेल तर 31 मार्चआधी या योजनेकरता नोंदणी करा. 31 मार्च आधी रजिस्ट्रेशन करून तुमचा अर्ज स्विकारला गेल्यास होळीनंतर तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील. यासह एप्रिल किंवा मे मध्ये येणाऱ्या पुढील हप्त्याचे देखील पैसे मिळतील.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!