Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मधील युवा उद्योजकाने लग्नाचा खर्च टाळून भंडारा डोंगरावर साकारत असलेल्या मंदिरास केली आर्थिक मदत … युवा पिढीला घालून दिला नवा आदर्श!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : पुणे जिल्ह्यातील भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात . याकरिता भव्य मंदिर असावे, असे सर्व भक्तांना वाटत होते. आणि मनोकामना डोळ्यासमोर ठेवून भंडारा डोंगर समितीने तुकाराम महाराजांच्या भव्य अशा मंदिराचे काम हाती घेतले आहे. यास जवळपास १०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Google Ad

या मंदिराच्या उभारणीसाठी समाजातील अनेक भक्तांनी आणि उद्योजक , दानशूर मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे. कासारवाडी येथील दत्तजयंती साप्ताहात जवळपास ३० लाखाचा निधी मंदिर समितीच्या विस्वस्त यांच्याकडे सोपविण्यात आला. यात उद्योजक विजूशेठ जगताप यांचा सहभाग मोठा होता. याच आवाहनाला प्रतिसाद देत आज (दि.०२ जानेवारी) वाकड येथील अक्षय संजय विनोदे व सौ. सायली अक्षय विनोदे यांच्या शुभ विवाहा निमित्त बळंवत दामु विनोदे यांनी ५१ हजार रुपये, उद्योजक लक्ष्मण गजानन बालवडकर यांनी १लाख ११ हजार १११रुपये तसेच मनोज ठाकूर यांनी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सामाजिक बांधिलकी जपत भंडारा डोंगर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद महाराज,भंडारा डोंगर ट्रस्ट समितीचे सदस्य माजी नगरसेवक हभप आप्पा बागल महाराज, यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उद्योजक विजूशेठ जगताप, गणेशशेठ सोनवणे, महाराज शिवानंद स्वामी, निखिल इंगवले उपस्थित होते.

भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे.जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले गेले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!