Google Ad
Editor Choice Pune

BIG BREAKING : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग … आगीवर नियंत्रणाचे शर्थीचे प्रयत्न सुरू … कोरोनाच्या लशीला कोणताही धोका नाही!

महाराष्ट्र 14 न्यूज : सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

Google Ad

दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत आहे. भारतामध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.आ त अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचं पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे. घटनास्थळी आगीचे 10 बंब दाखल झाल्याची माहिती अग्निशामन विभागानं दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये लस तयार होण्याचं काम होत नव्हतं. लस तयार होणारी इमारत वेगळी आहे, अशी माहिती स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. “सीरमच्या विविध इमारती आहेत. त्यातील एकाला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्य स्थितीत कुठे आणि किती नुकसान झालंय याची ठोस माहिती देता येणार नाही,”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!