Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व धर्मादाय व खाजगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ‘ लागू करा … ‘आमदार लक्ष्मण जगताप’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , कोरोनाग्रस्तांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये ( ICU beds , 0 2 beds , venti beds , remdesivir ) या वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे . सन २०२० मध्ये परिणामी राज्य शासनाने लागू केलेल्या अधिसूचना क्रमांक कोरोना २०२० सी.आर ९ ७ / आरो -५ , सार्वजनिक आरोग्य विभाग नवी मंत्रालय , मुंबई ४०००१ दि . २१ मे २०२० नुसार सर्व धर्मादाय व खाजगी रूग्णालयाने ८० टक्के बेड कोविड १ ९ रुग्णांसाठी राखीव ठेवावेत , असा निर्णय घेण्यात आला होता.

याला जबाबदार कोण?

Google Ad

त्या अनुषंगाने याची अंमलबजावणी देखील रुग्णालये करत आहेत . परंतु कोविड १९ च्या उपचाराचा खाजगी रुग्णालयातील खर्च हा सर्वसामान्य व गरीब रुग्णांना न पेलवणारा आहे . खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वाढत्या बिला संदर्भातील तक्रारीदेखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे . परिणामी उपचाराअभावी अनेक रुग्ण दगावले जात आहेत . परिस्थिती गंभीर होत चालली असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्न चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केला आहे.

राज्य शासनाने पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये कोविड १९ च्या उपचारासाठी ‘ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना वारंवार विनंती केली असून त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे .

🔴सर्वसामान्य व गरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचे तरी कुठे ?

सदर योजना अमलात आल्यास खाजगी रुग्णालयातील अतिरिक्त बिलासंदर्भातील तक्रारी कमी होतील व रुग्णांना दिलासा मिळेल . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कालावधीत पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये , सदर ‘ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ‘ योजना तातडीने लागू करण्याबाबत संबंधित विभागांना आपल्या स्तरावरून योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात यावेत , अशी विनंती आमदार जगताप यांनी केली आहे.

तसेच ज्या स्वरूपात मागील दोन महिन्यात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे . कोविड १९ च्या रुग्णास HRCT , सिटी scan , एक्सरे टेस्ट करिता डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाठविण्यात येत असून तेथे टेस्ट साठी रुग्णाकडून अतिरक्त दर आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत . हे रोखण्यासाठी राज्यातील खाजगी प्रयोगशाळाकरिता शासनाच्या अधिनियम १८९ ७ नुसार रॅपीड व अंटीजेन / RTPCR टेस्ट करिता जसे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने कोविड विषाणूच्या संदर्भातील होणाऱ्या सर्व चाचण्यासाठी सर्वसामान्यांना परवडणारे दर निश्चित करण्यात यावे. अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!