Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : कोरोनाचे थैमान … रेल्वेने घेतला मोठा निर्णय … आजपासून या गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.१९ एप्रिल) :देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. कोरोनाचा थैमान दिसून येत आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका रेल्वेला बसला आहे. प्रवाश्यांची संख्या कमी असल्याने पुढील आदेश येईपर्यंत काही गाड्या रद्द राहतील, असे रेल्वे (Indian Railway) प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रात दिवसाला कोरोनाबाधितांचा आकडा 50,000 पेक्षा जास्त दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती गुजरात राज्यातही आहे. या ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णवाहिकांमध्ये उपचार करण्यात येत आहे. काही ठिकाणी रुग्णवाहिकांच्या रांगा दिसून येत आहे.

Google Ad

इतकी भयावर स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या दोन राज्यांत धावणाऱ्या रेल्वे आज आणि उद्यापासून बंद करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय केल्याचे दिसून येत आहे. मात्र, रेल्वेकडून कमी प्रवासी संख्या हे कारण देत या रेल्वे बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हळूहळू लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

🔴या रेल्वे आजपासून बंद

• 09007 सूरत – भुसावळ स्पेशल
• 2959 वडोदरा – जामनगर सुपरफास्ट स्पेशल

• 2960 जामनगर – वडोदरा सुपरफास्ट स्पेशल

• 09258 वेरावल – अहमदाबाद स्पेशल

• 09323 डॉ आंबेडकर नगर – भोपाळ स्पेशल

• 09340 भोपाळ- दाहोद स्पेशल
उद्यापासून या गाड्या बंद

• 09257 अहमदाबाद – वेरावल स्पेशल

• 09008 भुसावळ – सूरत स्पेशल

• 09077 नंदुरबार – भुसावळ स्पेशल

• 09078 भुसावळ – नंदुरबार स्पेशल
• 09339 दाहोद – भोपाळ स्पेशल

· 09324 भोपाळ – डॉ आंबेडकर नगर स्पेशल

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!