Google Ad
Editor Choice

‘आत्ता सगळं कसं ओके’ … महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी सांगवीतील स्पर्धा परिक्षा केंद्राच्या केलेल्या तक्रारीला यश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०१ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथिल शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंद्राची झालेली दुरवस्था अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “ह” प्रभाग अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कासारवाडी पुणे यांच्याकडे एक महिन्यांपूर्वी केली होती.

यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी लवकरच कारवाई करून सर्व कामे पुर्ण करू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कामाला सुरवात देखिल केली जुने फर्निचर काढले, जुन्या सर्व अस्ताव्यस्त पडलेल्या खुर्च्या काढण्यात आल्या, तुटलेले टेबल काढून टाकले, बंद ट्यूब लाईट दुरुस्त करून चालू केल्या, आरोग्य विभागाने साफसफाई केली, स्लाडिंग खिडक्या स्वच्छ करण्यात आल्या, अडगळीचे अडथळे त्वरित काढून घेतले .

Google Ad

शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंन्द्र विद्यार्थ्याना अभ्यासिका “असुन अडचन नसून खोळंबा ” अशी अवस्था झाली होती.येथिल अभ्यासिकामधिल वर्षांपूर्वी पेंन्टीग, काही फर्णीचर,सर्व खुर्ची बदलण्यात आल्या आहेत परंतू जुने सर्व फर्णीचर,सर्व खुर्ची तशाच अस्थाव्यस्थ पडल्या असल्याने खुप अडथळा निर्माण झाला होता.तसेच साफसफाई देखिल होत नाही. अतिशय धुळीचे सामराज्य झाले होते.

विद्यार्थीना येथे अडचनित,अस्वच्छतेत बसावे लागत असे. विद्यार्थीना अभ्यास करण्यास स्वच्छ व प्रसन्न वातावरण असावे येथिल लाईटचे बोर्ड हालत होते तर निघाले होते.,फॅनचे आवाज येत होते व अस्वच्छ होते , वाचमन व शिपाई कधीही जागेवर नसायचे ‘आत्ता सगळं कसं ओके ‘ सध्यातरी सर्वजण जागेवर असतात आणि अनेक समस्या होत्या त्याही दूर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रसन्नता वाटत आहे.

,मनपाने मनसेच्या दिलेल्या निवेदनावर त्वरित दोन दिवसातच गांभिर्याने लक्ष दिले व अभ्यासिकाची सर्व पाहणी तसेच चौकशी करून त्वरित संबंधित विभागाना पत्र व्यवहार करून कामाचे आदेश देऊन सर्व काम करून घेतले त्याबद्दल सर्व कामे करणाऱ्या विभागांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने आपले सर्वाचेच मनःपुर्वक धन्यवाद सुध्दा मानण्यात आल्याचे राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement