Google Ad
Editor Choice

दत्तजयंती कीर्तन सोहळ्यानिमित्त कासारवाडीतील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम … पहिल्याच दिवशी भाविकांच्या मांदियाळीने फुलला

नामाचे चिंतन प्रगट पसारा! असाल ते करा जेथे तेथे !!

सोडवील माझा स्वामी निष्चयेसी ! प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही!!

गुण दोष नाही पाहात कीर्तनी! प्रेमे चक्र पाणी वश्य होय !!

तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच! रोकडे रोमांच कंठ दाटे !!

।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ डिसेंबर) : मिती मार्गशीर्ष शुध्द शके १९४४, गुरुवार दि. ०१-१२-२०२२ ते ०८-१२-२०२२ श्री दत्तजयंती निमित्ताने सुरू होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ  सकाळी ९.०० वा. प.पू. श्री. शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुती महाराज कु-हेकर (वारकरी शिक्षण संस्था,आळंदी) तसेच प. पू. श्री. मंदार महाराज देव (मोरया गोसावी देवस्थान ट्रस्ट, चिंचवड), प. पू. श्री. पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे (चिंचवड), मा. विलास विठोबा लांडे (माजी आमदार), मा. श्री शंकर पांडुरंग जगताप (भाजपा,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तसेच प्रकाश नामदेव काटे (नर्मदा गार्डन), शशिकांत कदम, राजेंद्र राजापुरे, सागर अंगोळकर, उषाताई मुंढे, उज्वलाताई गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, दररोज कीर्तन सेवा अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पिंपळे गुरव-कासारवाडी परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावून गेले आहे.

Google Ad

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी येथे दत्तजयंती निमित्त माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीने ०१ डिसेंबर ते दिनांक ०८ डिसेंबर
सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या मधुर किर्तनाने झाली .

ह. भ. प. ‘चंद्रकांत महाराज वांजळे‘ यांनी आपल्या कीर्तनात नामचिंतनाचे महत्त्व सांगताना सांगितले की तुम्ही जेथे असाल तेथे नामचिंतनाचा उघड उघड प्रसार करा. मग तुम्हांला बंधनातून माझा स्वामी म्हणजे हा परमात्मा निश्चित सोडवील हे आम्ही त्याचे दास प्रतिज्ञा करून सांगतो. कोणीही कीर्तन म्हणजे हरी चिंतन करणारा असो तो कुठल्याही प्रकरचे गुण व दोष पाहत नाही, त्याला प्रेमाने आळविले म्हणजे तो आपला अंकित होतो.तुकाराम महाराज म्हणतात या हरी कीर्तनामध्ये इतके प्रेम आहे की हा प्रपंच कडू वाटू लागतो व कीर्तन ऐकल्यावर अंगावर रोमांच उठतात त्यामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होऊन कंठ दाटून येतो.

सुंदर अशा भव्य मंडपात संत तुकाराम महाराजांच्या भांडरा डोंगरावर साकारत असलेल्या भव्य मंदिराचा देखावा तसेच माऊली पांडुरंग आणि गोपाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्याचे मंदिर ट्रस्ट च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे, या कीर्तन सोहळ्यास पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजप निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, भंडारा डोंगर ट्रस्टचे बाळासाहेब काशिद, शिवानंद स्वामी महाराज, विजूशेठ जगताप, विजय अण्णा जगताप, आप्पा बागल, राजाराम महाराज, गंभीर महाराज अवचर, अभिमन्यू महाराज पांचाळ, उध्दव महाराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील नियोजित संत तुकाराम महाराज मंदिरासाठी विविध भाविकांनी देणगी रुपात मदत केली. तसेच याप्रसंगी विविध मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!