Google Ad
Editor Choice Pune

पुणेकरांसाठी महामेट्रोची खूशखबर … पुण्यात सायकलसह करता येणार मेट्रो प्रवास!

महाराष्ट्र 14 न्यूज : सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील नागरिक आता आपल्या सायकलसह मेट्रो प्रवास करु शकणार आहेत. राज्यासह देशातील पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचे दर मोठ्या प्रमाणवार वाढत आहेत. अशा स्थितीत सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच, नागरिक सार्वजनिक सेवांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करु लागले आहेत. नागरिकांच्या या बचतीला हातभार लावणारा निर्णय घेत महामेट्रोने ही खूशखबर पुणेकरांसाठी दिली आहे. पुणे शहर हे बदलत्या काळासोबत बदलत आहे. त्यामुळे सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.

असे असले तरी पुण्यामधील बहुतांश रस्त्यांवर सायकल ट्रॅक पाहायला मिळतात. त्यामुळे पुणेकरांचे सायकलवर अद्यापही प्रेम असल्याचे पाहायला मिळते. दुसरे असे की, इंधनाचे दर परवडत नसल्याने अनेक पुणेकरांनी सायकलवरुन प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेट्रोतून सायकलसह प्रवास करण्यास परवानगी मिळावी अशी भावना अनेक पुणेकर व्यक्त करत होते.

Google Ad

महामेट्रोचे व्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती देताना सांगितले की, सायकलसह मेट्रोप्रवास करणाऱ्या पुणेकरांना अशा प्रवासात कोणतेही इतर शुल्क अधिकचे द्यावे लागणार नाही. म्हणजेच मेट्रोप्रावसाच्या तिकीट दरात सायकल घेऊन जाता येणार आहे. शहरातील सर्व वयोगटातील लोक आपली सायकल घेऊन मेट्रोतून प्रवास करु शकणार आहेत.
हेमंत सोनवणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, नागपूर शहरातही अशाच प्रकारची परवानगी देण्यात आली आहे. परंतून नागपूरमध्ये अशी परवानगी केवळ सायकल प्रेमी आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. पुण्यात मात्र, या परवानगीची व्याप्ती वाढविण्या आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला अशा सर्वांनाच आणि सर्व वयोगटातील मंडळींना मेट्रोमधून सायकल घेवून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.यासाठी कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!