Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ‘प्रशांत सपकाळ’ यांच्या वतीने … थेरगाव येथे ‘सन्मान नारी शक्तीचा’ उपक्रमाचे आयोजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष माननीय प्रशांत दिलीप सपकाळ तसेच दयावान सोशल फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 08/03/2021 रोजी सन्मान नारी शक्तीचा हा उपक्रम प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथे राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक तसेच इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माता-भगिनींना सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष विद्यमान नगरसेविका माननीय वैशाली जालिंदर काळभोर, जिजामाता रूग्णालयाच्या डॉक्टर वैशाली बामणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 च्या विद्यमान नगरसेविका अर्चना तानाजी बारणे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती जनाबाई जाधव, सामाजिक कार्यकर्त्या संगमित्रा नवनीत चेतवन, सामाजिक कार्यकर्त्या नंदा काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर उपाध्यक्ष सिंधुताई गिरी तसेच सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई शिवरकर, अर्चना ताई मुंडे, कल्पनाताई आल्हाट, रुक्मिणी ताई जाधव, स्नेह ज्योत कल्याण सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अॅड स्नेहल ताई कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

Google Ad

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेच्या माजी अध्यक्षा सौ शशिकला दिलीप सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे शहर उपाध्यक्ष प्रशांतजी सपकाळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संदीप वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विशालजी पवार, सा. का. प्रमोद शिंदे, सरकार, सा. का. संतोषजी कांबळे, लल्लेशजी गायकवाड, अक्षय गिरी, सा. का. राजेशजी ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बारणे, अमित गायकवाड, अॅड राऊत सर इत्यादी उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीतदादा आल्हाट यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!