Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड प्रभाग क्र.३१ ‘नवी सांगवी-पिंपळे गुरव’ च्या गणेश मंडळांचा मनपाच्या सहकार्यातून गणेश मूर्ती विसर्जनाचा आगळावेगळा उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज : संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच पिंपरी चिंचवड शहरावर आलेले कोरोनाचे संकट पाहता यंदाच्या गणेशोत्सव कालावधीत सर्व शहरवासियांनी आपली व इतरांची काळजी घेवून हा उत्सव साजरा करावा यासाठी तसेच गणेश विसर्जनाबाबत मनपाने दिलेल्या सुचनांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा गणेश विसर्जन घाटावर न करता शाडूंच्या मुर्तींचे घरीच बादलीत विसर्जन करावे व ज्यांच्या घरी गणेश मुर्ती ही प्लॅस्टर ॲाफ पॅरीसची आहे ती त्यांनी स्वयंसेवी संस्था ज्या घरगुती गणपती दान स्वरुपात स्विकारणार आहेत व त्यांचे विधिवत विसर्जन करणार आहेत त्यांना दान कराव्यात अशा सुचना केल्या आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने प्रभाग क्रमांक २९ , ३१ ,३२  ठिकाणी श्रीगणेश मुर्ती दान करण्याची व्यवस्था केली आहे.
1) कर संकलन इमारत (गजानन महाराज मंदिरा समोर. सांगवी
2) बॅडमिंटन हॉल (P W D ग्राऊंड ) सांगवी – नवी सांगवी
3) रामकृष्ण मंगल कार्यालय
4) म.न.पा.शाळा पिंपळे गुरव
5) मल्हार गार्डन नवी सांगवी

तसेच म.न.मा.मार्फत चौका चौकात श्री.ची मुर्ती संकलनसाठी फिरत्या गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बरोबर नवी सांगवी-पिंपळे गुरव (प्रभाग ३१) या भागातील सार्वजनिक गणपती मंडळांचे सहकार्याने मंडळाचे ठिकाणी घरगुती गणेशमुर्ती दान स्वीकारल्या जाणार आहेत. या ठिकाणी मंगल मूर्ती संकलन केले जाईल तसेच म. न.पा.मार्फत प्रभागात सर्व भागात चौकांमध्ये मंगल मूर्ती संकलना साठी गाडी फिरविण्यात येईल.सदर व्यवस्था ५ वा.७ वा.९ वा.१० वा. अनंत चतुर्दशी अशा सर्व दिवशी करण्यात आलेली आहे.

यात स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक गणेश मंडळे तसेच मनपाच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेश मूर्ती संकलन केंद्राचे विशेष नियोजन व सहकार्य केल्याचे दिसून येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!