Google Ad
Editor Choice india

Delhi : डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार , कॅश काढताना द्यावी लागणार ‘ ही ‘ माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज : अर्थकारणा शी निगडीत एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून देशात बँकिंगशी संबंधित नियम बदलणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना एटीएममधून (ATM) पैसे काढणं आणखी सोपं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून यासंबंधी काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात. अधिक माहितीनुसार, बँका 1 डिसेंबरपासून ओटीपी च्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे.

सध्या ही सुविधा फक्त पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सुरू केली आहे. यासंबंधी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर यासंदर्भात ग्राहकांना मेसेजेसदेखील पाठवले जात आहेत. तर याआधी एसबीआय (SBI ) नेही ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे हा नियम आता सर्व बँका लागू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Google Ad


पंजाब नॅशनल बँकेने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपासून एटीएममधून दहा हजाराहून काढण्यासाठी ओटीपी देणं आवश्यक असणार आहे. या नियमानुसार, नाईट हावर्स म्हणजेच रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत लागू करण्यात येईल. यावेळी एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना त्यांचा मोबाइल ओटीपी देणं महत्त्वाचं असले.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 1 जानेवारी 2020 पासून एटीएममधून ओटीपी आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममध्ये सकाळी आठ ते सकाळी आठ या दरम्यान दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपी द्यावा लागणार आहे. पण आता ही सुविधा 24 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!