Google Ad
Editor Choice Pune

Pune : भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार ; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींच लक्ष्य : पुनावाला

महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत कोरोना लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. मोदींनी जवळपास 1 तास सीरममधील संशोधकांशी चर्चा केली. यानंतर आता सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली. यावेळी पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिलं.

आदर पुनावाला म्हणाले, “जगभरातील एकूण लसींपैकी 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली.”

“आम्ही पंतप्रधान मोदींसोबत लस वितरणाबाबत चर्चा केली. मात्र, हे वितरण आपत्कालीन वितरणाची मंजूरी मिळाल्यानंतरच शक्य होणार आहे. यासाठी आम्ही योग्य आकडेवारी आणि माहिती संबंधित विभागाकडे जमा करत आहोत. त्यांनी याची तपासणी केल्यानंतरच ही मंजूरी मिळेल. अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,” असंही पुनावाला यांनी सांगितलं.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!