Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Walchandnagar : पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात … ४ गावठी पिस्तूल जप्त वालचंदनगर पोलीस स्टेशन यांची कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज : पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मागील आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष पुणे ग्रामीण यांनी शिरूर येथे मोठी कारवाई केली होती त्यानंतर पुढील कारवायांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह वालचंदनगर-भिगवण हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर यांना बातमीदारा द्वारे दोन इसम वालचंद नगर भिगवण परिसरामध्ये पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत

अशी माहिती मिळाली होती या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्टाफ यांच्या मदतीने मुक्तार अजीज शेख वय १९ वर्षे योगेश कचरू धोत्रे वय २१ वर्ष दोघेही राहणार- गोधेगाव तालुका- नेवासा जिल्हा- अहमदनगर यांना येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल व ६ जिवंत काढतुस जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंद नगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
*सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार वालचंद नगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते,

पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप वालचंद नगर पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, विश्वास खरात, राजेश पवार , पोलीस हवालदार राजेंद्र मिरगे, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंद नगर पोलीस स्टेशन स्टाफ पोलीस हवालदार प्रकाश माने, विशाल निर्मळ, नितीन कळसराइत व विजय शेंडकर पथकाने केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!