Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६एप्रिल) : महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेस महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ब वर्ग महापालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

यासाठी प्रश्‍नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येत असते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येत असते. त्यामध्ये निवड झाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Google Ad

महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी याबाबतचे पत्र आज महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेस पाठविले आहे. सन २०१८-१९ या वर्षात विविध महापालिकांनी केलेल्या विविध कामांची माहिती महाराष्ट्र महापौर परिषद आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मागविण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील यात सहभाग घेतला व आपण केलेल्या कामांची माहिती पाठवली होती.महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय नियोजन, राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, ऑनलाइन सेवा सुविधा, केंद्र आणि राज्य शासनाच्या महापालिकांसाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी याबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडाचा विकास, पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मल:निसारण योजनांची सर्व भागात केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून खत आणि वीज निर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली होती.

कौशल्य विकास योजना, दिव्यांगासाठीच्या योजना, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा आदी विविध स्तरावर पिंपरी चिंचवड महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे ब वर्ग महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 75 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेने तत्कालीन महापौर माई ढोरे तसेच आयुक्त राजेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!