Google Ad
Editor Choice

सांगवी पोलिस स्टेशनला अग्निशामक उपकरणे भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : पिंपळे गुरव येथील ओमसाई फाऊंडेशन तर्फे सांगवी पोलीस स्टेशनला आमदार लक्ष्मण जगताप व उद्योजक माऊली जगताप यांच्या मार्गदर्शना खाली मा. नगरसेवक शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निशामक रोधक सिलेंडर देण्यात आले.

त्यावेळी ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की बऱ्याच शासकीय काही शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे प्रकार झाले आहे.त्यामुळे शासनाचे व नागरिकांचे दस्त ऐवज जळून गेल्याने खुप मोठे आर्थिक व मानसिक नुकसान झाले.असे अनुचित प्रकार आपल्या पोलीस ठाण्यांमध्ये होऊ नये म्हणून आपली समाजप्रती नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही सांगवी पोलीस स्टेशनला फायर सिलेंडर देत आहोत.

Google Ad

या प्रसंगी सांगवी पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे म्हणाले की पोलिस स्टेशनमध्ये अग्नी रोधकचि अत्यंत गरजेचं होते.तसेच फाउंडेशनतर्फे फायर प्रशिक्षण घेण्यात यावे.ओम साई फाऊंडेशनने केलेल्या चांगल्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो

या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस निरीक्षक सुनील तांबे,पोलिस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे, हवालदार नलिनी गायकवाड,रमेश चौधरी,हवालदार रेखा साबळे, राजू अवळेकर,
रवी खोकर,शैलेश थोरात उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!