Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पवना धरण १०० टक्के भरले असताना सुद्दा? … पाणीपुरवठा बैठकीस सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी फिरवली पाठ!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहराला सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे आज दिसून आले. शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही शहरात अजूनही दिवसाआड आणि अशुद्ध पाणी का येते . याची विचारणा करण्यासाठी उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी आयोजित केली होती .

मात्र महापौर उषा ढोरेंसह केवळ आठ नगरसेवक उपस्थित राहिले . विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचीही गैरहजेरी होती . महापालिका भवनात दुपारी साडेचारला बैठक सुरू झाली . याला स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , मनसेचे गटनेते सचिन चिखले , अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे , नगरसेवक अभिषेक बारणे , तुषार कामठे आणि अतिरिक्त आयुक्त अजित पवार , पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

Google Ad

शहरातील ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडून आले आहेत . प्रत्येक प्रभागात अनियमित , अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो . बैठकीत हिंगे उपरोधिक म्हणाले , “ गढूळ पाण्यासंदर्भात अद्ययावत प्रणालीने क्लोरिनची नवी काही पद्धत असेल तर ती त्वरित अमलात आणा . जेणेकरून गढूळ पाण्याविषयीच्या तक्रारी कमी होतील .

यावर संबंधितअधिकाऱ्यांना काहीच सांगता आले नाही . प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण यंत्रणा निकामी झाली आहे . सहा महिन्यांपासून काही नियोजन नसल्याने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावली आहे . याचीही माहिती तांबे यांना नसल्याचे उघड झाले . ” शहरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे . नागरिक आजारी पडत आहेत . त्यासाठी तुम्ही नियोजन केले आहे का ? ” असा सवाल महापौर ढोरे यांनी केला .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!