महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०ऑगस्ट) : कोरोनाच्या देशावरील आलेल्या संकटात सर्वच शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेस आणि वर्ग 4 चे सर्वच कर्मचारी ना रजा रद्द करण्यात येऊन 24 तास कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते यानुसार परिचारिका गेले वर्षभर कोणतीही रजा न घेता 24 तास नोकरीवर देशसेवेवरील कोरोना महामारी नष्ट करणेसाठी सज्ज झाली आहे.
यामध्ये अनेक स्टाफ नर्सेस, डॉक्टर्स ना काही सोसायटी मध्ये राहण्यास विरोध केला गेला,तर काहींना दगड मारण्यात आले तर काहींना वाईट वागणूक दिल्याची अनेक सोसायटी मधील बातम्या covid या महामारी मध्ये होत्या तरी आज प्रामुख्याने स्टाफ नर्सेस या पूर्ण महाराष्टातील एकत्र येऊन अनियमित बदली चे विरोधात शासनाचे विरोध काळी फित लाऊन आंदोलन करण्यात येत आहे .

याकरिता त्यांनी रुग्णाची सुद्धा काळजी घेतली असून पन्नास लोकांची स्टाफ नर्सेस ची टीम रुग्णालयात 24 तास कार्यरत ठेऊनच आंदोलन चालू केले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिचारिकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे पुणे आरोग्य उपसंचालक अंतर्गत पुणे, सोलापूर आणि सातारा अशी तीन जिल्हे येतात यामध्ये एका जिल्हा मधून दुसऱ्या जिल्हा मध्ये बदली न करता समुपदेशन नुसार जिल्हा अंतर्गत बदली होणे गरजेचे आहे तसेच सध्या सर्वच पालकांनी स्कूल,कॉलेज ला एडमिशन केले आहे, यामुळं सदर झालेल्या बदल्या ह्या परिचारिकांच्या संसारावर कुऱ्हाड घालण्या सारखे आहे
आता गंभीर बाब म्हणजे बदली आदेश जारी करण्यात आले मुळे मुलाची व्यवस्था कुठे करायची हा ज्वलंत प्रश्न आहे .
पुणे विभागीय संचालक डॉ अर्चना पाटील ह्यांनी परिचारिकांच्या दिलेल्या निवेदनात केराची टोपली
दाखवली आहे त्या काहीही एकण्याच्या मनस्थिती मध्ये नाहीत त्यांनी अधिकार नसताना परिचारिकांना पुणे जिल्हा मध्ये पिंपरी चिंचवड ते पुणे शहर अशा बदली नाकारल्या आहेत आणि शासनाच्या धोरणं विरोधी काम करत आहेत यामुळे सदर बदली आदेश पूर्णपणे रद्द होऊन बदली या प्रक्रिये मधून परिचारिकांना वगळण्यात यावे व फक्त विनंती नुसार व रुग्णाची काळजी घेणे करिता निकड नुसार बदली करण्यात यावी असे महाराष्ट्रातील नगर,औरंगाबाद आणि पुणे विभागातील अधीपरीचारिकानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले
यामध्ये समन्वयक श्री रवींद्र पाटील नगरच्या परिचारिका अध्यक्षा श्रीमती वैशाली गुरव पुणे विभागाच्या परिचारिका संगठन चे श्रीमती इंदूमती थोरात श्रीमती कमल वायकोळ , श्रीमती शेख तसेच पुणे परिचारिका संगठन चे अध्यक्ष श्रीमती सुमन टिळेकर यांनी मिळून अधिपरीचारिकांचे अनियमित बदल्या रद्द करण्यात यावीत म्हणून अमारण उपोषण बरोबर तीव्र आंदोलन केले तसेच रुग्ण सेवा खंडित न करता रुग्णाची काळजी घेत काळी फित लाऊन रुग्ण सेवा बजावून नागरिक व रुग्णांना परिचारिकांनी दिलासा दिला आहे यामुळे अनेक परिचारिकांच्या मागणी मध्ये प्रामुख्याने पुणे येरवडा रुग्णालयाच्या सिनियर परिचारिका श्रीमती नूतन धनवार म्हणाल्या आणि covid सेवा देताना आमच्या फामिलीला covid झाला होता तरी देशसेवा हेच ब्रीद समोर ठेऊन आम्ही कुटुंबाला बाजूला ठेऊन रुग्ण सेवा खंडित होऊन न देता 24 तास चालू ठेवली आहे यामुळे त्यांनी समाजाला आहा वान केले आहे की आम्ही तुमच्या जीवाची काळजी घेतली आहे आता शासनाने आमच्या बदल्या जिल्हा बाहेर करून आमचे संसार उदावस्थ करत आहेत तरी आता आम्ही लेकरं बाळ घेऊन प्रश्न कसे सोड्यायचे तरी covid मुक्त झालेल्या रुग्णांनी आमचे पाठीशी राहावे अशी भावना व्यक्त केली आहे,
4 Comments