Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

झुंज संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप … स्वावलंबी, सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांची दिली माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आयोजन घरकुल चिखली याठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रातील माननीय राजेश दिवटे प्रेरणादायी सामाजिक आधार संस्थाध्यक्ष , अशोक बनसोडे रहाटणी लायन्स क्लब , राजश्रीताई गागरे संचालिका डिकक्कई , आप्पा जाधव उपाध्यक्ष भाजपा चिखली निगडी मंडळआदी मान्यवर उपस्थित होते .

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना मास्क व सैनी टायझर चे वाटप करण्यात आले व दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना मास्क तयार करण्याची साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये विविध मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती दिली , यामध्ये नोकरी मार्गदर्शन , महिला बचत गट , ऑनलाइन विवाह नोंदणी करणे यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते .

Google Ad

तसेच या कार्यक्रमांमध्ये कोवीड योद्धा यांचा सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मोरे , बाळासाहेब राठोड व कार्यक्रमाचे आभार झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे व महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ . नूतनताई रोहमारे यांनी केले . झुंज दिव्यांग संस्थेचे सर्व उपस्थित मान्यवर दादासाहेब काशीद , दत्तात्रय काळे , बाळासाहेब मुळे , तानाजी मराठे , गणेश रोहमारे , ओममलंग घोणे , सतीश बोत्रे , गणेश शेडगे , सत्यवान माने , सारिका राजपूत यांनी भाग घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!