Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : “अजित पवार यांचं सरकारी ड्रेसकोडवर भाष्य … ” ते जीन्स पँटचं चुकीचं झालं , पण …

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोडचे नियम जारी केले आहेत. यानुसार कार्यालयात काम करताना सरकारी कर्मचाऱ्यांना आता या नियमांचं पालन करावं लागणार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स पँट घालू नये, असंही नियमांत म्हटलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

सरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिक आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाही. घरी असले टी शर्ट घातलं तर ठीक आहे. जिन्स पँटचं चुकीचं झालं. बघू आम्ही त्याच्यावर विचार करतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

🔴जीन्स-टीशर्ट चर्चेत का?
महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

Google Ad

🔴सरकारची भावना काय?
सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केल्याचं बोललं जातं. आता सरकारने कर्मचाऱ्यांची वेशभूषा बदलली असली, तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहणार आहे. ज्या पद्धतीचा त्रास नागरिकांना सर्वाधिक होतो, ती पद्धत बदलण्यासाठी सरकारने काही तरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे, तरच कपड्यांसोबत बदललेला सरकारी कर्मचारीही व्यवस्था बदलाचा भाग होईल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

🔴काय आहेत सूचना?

गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत

अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये

कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत

महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावेत

पादत्राणांविषयी नियमावली

स्लीपर घालण्यासही सरकारी कार्यालयात परवानगी नाही

महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावेत

पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी

कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!